नियतिच्या वाराने हतबल झालेल्या, खचलेल्या माझ्या एका प्रिय मैत्रिणीसाठी लिहिलेल्या माझ्या एका पत्रातील मजकुर :
प्रिय ---,
"कधी कधी आयुष्य अश्या वळणावर आणून सोडतं की मागे वळणही शक्य नसतं आणि पुढे चालावं तर मार्ग सापडत नाही. कोणाची सोबत नसते आणि हातातून हात कधीच सुटून गेलेले... असतं ते फ़क्त लांबच लांब पसरलेलं रखरखीत ऊन आणि कोरं करकरीत आकाश. आशेचं एकही बीज जिच्या पोटी रुजणार नाही अशी रूक्ष धरती... आणि यात भर टाकायला धुळीचे प्रचंड लोट घेऊन आलेलं एक वादळ...
प्रिय ---,
"कधी कधी आयुष्य अश्या वळणावर आणून सोडतं की मागे वळणही शक्य नसतं आणि पुढे चालावं तर मार्ग सापडत नाही. कोणाची सोबत नसते आणि हातातून हात कधीच सुटून गेलेले... असतं ते फ़क्त लांबच लांब पसरलेलं रखरखीत ऊन आणि कोरं करकरीत आकाश. आशेचं एकही बीज जिच्या पोटी रुजणार नाही अशी रूक्ष धरती... आणि यात भर टाकायला धुळीचे प्रचंड लोट घेऊन आलेलं एक वादळ...
मग वाटतं की का हे सर्व माझ्याच वाट्याला? का मीच सहन करायचं? मागच्या जन्माचं फळ म्हटलं तरी किती कडू फळ चघळत बसायचं? का???
हे वादळ थोपवता येत नाहीये, थांबवता येत नाहीये. काय करायचं? धीर सोडून स्वतःला त्याच्या स्वाधीन करून द्यायचं आणि त्या वावटळीत ते नेईल तिकडे, नेईल तसं वाहत जायचं की स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड़ायचं?
याचं उत्तर काय हे आपल्याला माहिती आहेच. मान्य आहे की मनात खूप काही असतं. या मनाची ताकद इतकी प्रचंड असते की क्षितिजही अपुरी पडतात. पण मनाच्या झेपेला परिस्थितीची साथ कितपत आहे ते पण नक्कीच महत्वाचं आहे. मात्र ही परिस्थिती म्हणजे तरी काय?
आता थोड खोलात जाऊया. Philosophy नाही, पण वास्तव जाणून घ्यायचा एक साधा प्रयत्न करुन पाहुया.
तर ही परिस्थिती म्हणजे नक्की काय? आपण आणि आपल्या भोवतीची माणसं, त्यांच्याशी असलेल्या आपल्या नात्यांची गुंतागुंत आणि बाकीचं भौतिक जग.. यातच चांगली- वाईट अशी सगळी माणसं समाविष्ट होतात. मग ती माणसं कोण? कोणाची? कोणासाठी? याचं उत्तर एकच- ही माणसं आपलीच आहेत आणि आपल्याचसाठी ती या परिस्थितीचा भाग आहेत. फिरून फिरून उत्तर हेच की काही प्रमाणात आपल्या परिस्थितीचे कळत-नकळत निमित्त आपणच असतो. परंतु ही परिस्थिती आपल्या मनासारखी नेहमीच नसते याचं कारण म्हणजे तिचा भाग असणारे सगळे स्वतंत्र आहेत आणि त्यांची त्यांच्यासाठीची एक वेगळी परिस्थिती आहे, जिचा कदाचित आपण दुय्यम घटक असू शकतो. अश्या या परिस्थितीचे नियंत्रण आपल्या हातात नसते आणि हेच कारण आहे या परिस्थितीला घाबरण्याचे, तिच्यापुढे नमतं घेण्याचे...
आपल्या हे लक्षात येत नाही की आपण जगतो ते आपलं स्वतःचं जीवन आहे. कोणत्याही वावटळीने येऊन ते मातीमोल करावं इतकी कमी किंमत नक्कीच या जगण्याची नाही.
ते वादळ थोपवता येत नसलं तरी त्यात सापडल्यावर त्याच्या दिशेने त्याच्यासोबत फरफटत जाण्यात नक्कीच शहाणपण नाही.
असेल ती सर्व शक्ती प्राणपणाने एकवटून त्यातून झगडून बाहेर पडण्यासाठी एकेक क्षण महत्वाचा असतो. तो एकेक क्षण गमावला की अस्तित्वाची माती व्हायला वेळ लागत नाही. गरज असते ती स्वतःतल्या जाणिवेला जागे ठेवण्याची आणि आत्मविश्वासाची..!"
हे पत्र इथे publish केले कारण जे कोणी हे वाचेल त्याला कधी नियतीच्या वादळाचा सामना करण्यासाठी आशेचा एक किरण जरी मिळाला तरी मी नशीबवान ठरेल.
tuzi maitrin jar itk heavy samjun ghet asel tar thik ahe,nahi tar mazyasarkhi asel tar tile tin char da vachav lagel, layach jad lihites tu, mazyasarkhya light lokanna lay jad vatttt te but still mala eka ashech kiran milala, ayushyat ladhnyachi takad milali, ata mi jagatlya kontyahi vadlacha samna karu shakto, kshitijachya par jau shakto, tyala namavu shakto, rakhrakhtya unhat chandrach sheetal chandan anu shakto....hmmm ajun kay kay karu shakto malach mahiti nahi.......
ReplyDeletebut one thing u should write... u can be a good author.... the way u write is diffffferenttt.....
ok thanx ..... tu ata nashibvan zalis.....bye
mi tar sangitalach nahi who am i
its gopal mahajan
Thanks Gopal..
ReplyDeleteMe kharach nashibvaan ahe..!