Sunday, September 11, 2011
" प्रश्नं "
काही नात्यांची गुंतागुंत, खूप सारे प्रश्नं, सापडली म्हणताच पुन्हा हरवलेली त्यांची उत्तरं...परक्यांमधलं आपलेपण आणि आपल्यांमधलं परकेपण !
का आणतं एखाद्याला आयुष्य अश्या वळणावर? ज्यांना आयुष्यभर आपलं म्हणण्याची अतोनात इच्छा असते, तेच का आपल्याला परकं करून टाकतात? एकदाही विचार करत नाहीत नव्या नात्याचा, नात्यातल्या नाविन्याचा ? अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली एखाद्याला दाबून टाकून त्याच्या अपेक्षांची माती करणं कितपत योग्य आहे ? घट्ट कवटाळून घेण्यासाठी हात पुढे केल्यावर नेमका आपला हात झुगारून दिला जातो. मायेने जवळ घ्यावं असं वाटताच तुम्हाला कोणी उडवून लावावं. असं खरंच का होतं? नक्की चुकतं काय आणि कुठे?
खरंच का आपली सगळी ओळखच संपवून टाकावी लागते आयुष्यातल्या काही नव्या नात्यांना वाव देण्यासाठी ? त्याशिवाय ते नाहीच का कधी आपले होऊ शकत? पण मग असं करताना स्वतःच्याच नजरेला नजर मिळवतांना आपलं अस्तित्वच संपल्याची जी भयानक जाणीव होते तिचं काय? ती वाटून घ्यायला तर कोणीच येत नाही न सोबत? तुम्ही स्वतःलाही पण तर गमावलेलं असतं तोवर....!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
अरे व्वा..हे नव्हतं माहित मला..ग्रेट यार
ReplyDelete